शेठ न. म. विद्यालय खारेपाटण येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज’ खारेपाटण येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण लोकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम राष्ट्रगीत आणि ध्वजगीताच्या सुरावटीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यानिमित प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कार्यानुभव विषयाच्या विविध प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकवर्ग यांनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला. 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये एन. सी. सी. व स्काऊट च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कला उत्सव 2025 मध्ये शेठ न. म . विद्यालय खारेपाटण च्या विद्यार्थ्यांनी देशात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. यावेळी सुरज गोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित देशभक्तीपर समूहगीताचे सादरीकरण करण्यात आले होते. खारेपाटण येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूह नृत्याचे सुंदर सादरीकरण यावेळी केले. उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त माननीय विजयजी देसाई यांनी वाढदिवसानिमित्त रु. दहा हजार देणगी स्वरूपात संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्याकडे सुपूर्द केले. अत्यंत आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी खारेपाटण सरपंच मान. सौ. प्राची इस्वलकर, उपसरपंच श्री महेश गुरव,प्रमुख पाहुणे भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार मान. श्री. दीपक लाड, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री रघुनाथ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, विश्वस्त श्री. प्रशांत गुळेकर,श्री. योगेश गोडवे श्री विजय देसाई श्री. गुरुप्रसाद शिंदे, श्री कांबळे सर, प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, केंद्र शाळा खारेपाटण नं 1 चे मुख्याध्यापक श्री. श्रावणकर, सर्व शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!