मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा हाच माझ्या विजयाचा विश्वास!

फोंडाघाट जि. प . चे उमेदवार अनंत पिळणकर यांचा झंजावती प्रचार

फोंडाघाट मधील दूषित पाण्याचा प्रश्न निवडून आल्यावर तात्काळ मार्गी लावणार

जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस शिगेला पोहोचत असताना राष्ट्रवादी पक्षाचे महाविकास आघाडीचे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार अनंत पिळणकर यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फोंडाघाट मतदार संघातील प्रत्येक गावात मतदारांच्या घरोघरी भेटी घेत असताना मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभ संकेत असल्याचे प्रतिपादन अनंत पिळणकर यांनी केले. फोंडाघाट मधील बावीचेभाटले, बिजलीनगर, पिंपळवाडी आदी भागांमध्ये घरोघरी प्रचाराचा धडाका पिळणकर व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लावला आहे. मतदार संघातील समस्या सोडवत असताना फोंडाघाट मधील शुद्ध पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम सोडवण्याची ग्वाही त्यांनी मतदारांना या घरोघरी भेटीदरम्यान दिली आहे. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी शरद पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर गुरुजी, सौ अवसरे, शिवसेना तालुकाप्रमुख माधवी दळवी, संजना कोलते, शिवसेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे, सुरेश टक्के, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विभाग प्रमुख रमेश राणे, लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, देवेंद्र पिळणकर, प्रीतम राणे तुषार पिळणकर विजय तायशेटे, अमित लाड, व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!