अजित पवार कुटुंबीयांचे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले सांत्वन

बारामतीत घेतली पवार कुटुंबीयांची भेट
बारामती येथे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सौ. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार तसेच पवार कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन व्यक्त केले.
ईश्वराने या अपार दुःखातून सावरण्याचे व हे दुःख सहन करण्याचे बळ पवार कुटुंबीयांना देवो अशी प्रार्थना त्यांनी केली.





