श्री देव आदिनाथ मंदिराचा 34वा वर्धापन दिन ६फेब्रुवारी रोजी

श्री देव आदिनाथ मंदिर वायंगणी यांचा ३४ वा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत.
स. ६ ते ७ वा. श्री गांगेश्वर मंदिर येथे श्री सत्यनारायण महापुजा
स. ७ ते ८ वा. श्री आदिनाथ मंदिर येथे अभिषेक
स. ८ ते ९ वा. श्री आदिनाथ मंदिर येथे श्री सत्यनारायण महापुजा
स. ९ ते १० वा. श्री देव गांगेश्वर गुंजवणे पालखी आगमन
स. १० ते १२ वा. नवस बोलणे, ओटी भरणे, नवस फेडणे.
दु. १२ ते ३ वा. महाप्रसाद
दु. ३ ते ५ वा. श्रींची पालखी मिरवणूक श्री देव गांगेश्वर, गुंजवणे
रात्री ८ ते १० वा. श्री देव आदिनाथ पालखी प्रदक्षिणा
रात्रौ ठिक १० वा.
२० x २० भजनाचा जंगी सामना
बुवा- कु. सुरज खांडेकर
श्री आई जांमाईदेवी प्रासादिक भजन मंडळ, पोंभुर्ले, देऊळवाडी
गुरुवर्य बुवा भजनसम्राट- श्री. संदीप पुजारे, श्री विजय पुजारे
पखवाज- मंझिल काळसेकर
तबला- शुभम खांडेकर
बुवा- कु. ऋतिक रविंद्र गांगण
श्री देवी वडचाई प्रासादिक भजन मंडळ, कुणकवण, बंदरवाडी
गुरुवर्य बुवा भजनसम्राट श्री. गणेश जांभळे, बुवा प्रमोद हर्याण
पखवाज- प्रणव धुरी,
तबला- प्रेम मेस्त्री असे नियोजन करण्यात आले आहे.
श्री देव आदिनाथ आणि श्री गांगोदेव मंदिर ट्रस्ट, वायंगणी
ता. कणकवली. जि. सिंधुदुर्ग
नोंदणी क्र. अ २९२/सिंधुदुर्ग.. यांनी भाविकांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.




