माझ्यावर अन्याय झाल्यानेच फोंडाघाट जि. प. मतदार संघातील जनता पेटून प्रचारात उतरली!

फोंडाघाट जि. प. मध्ये कपबशी चिन्ह व राजन चिके हे जनतेच्या मनात!
फोंडाघाट मतदारसंघात राजन चिके यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघामध्ये मतदारांनी आग्रह धरल्यामुळेच मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलो आहे. माझ्यावर अन्याय का झाला हे मला माहीत नाही. गेली 37 वर्ष भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काम करत असताना माझ्यावर जो अन्याय झाला त्या विरोधात जनता उत्स्फूर्तपणे माझ्यासोबत प्रचाराला उतरली आहे. त्यामुळे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघामध्ये कपबशी या निशाणीला मतदान करत मतदार मला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा मला विश्वास असल्याचे प्रतिपादन फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाचे अपक्ष उमेदवार राजन चिके यांनी केले. फोंडाघाट मतदार संघात घोणसरी मध्ये त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव गांगेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन केला. प्रचाराची हायटेक यंत्रणा राजन चिके यांनी वापरली असून याद्वारे ते जनतेपर्यंत आपली केलेली कामे व असलेला राजकीय अनुभव या यंत्रणेच्या माध्यमातून पोचवत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाई राणे, गोटू राणे, बाबू राणे, बाबू घाडी , अनंत गुरव, माजी तालुकाध्यक्ष छोटू पारकर, मकरंद पारकर, जयेश लाड, माजी सरपंच मृणाली पारकर, अनंत चिके, राजा लाड आदी उपस्थित होते.




