युवतीची छेड काढत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी दिलीप पवार व नदीम अहमद रशीद यांना जामिन मंजूर

आरोपी तर्फे ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद
कणकवली शहरालगत एका गावातील युवती तिच्या कामावरून रस्त्याने एकटीच घरी चालत जात असताना आरोपीनी तिची छेड काढत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याबाबत फिर्यादीने दिनांक ११/०१/२०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलिस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७५, ७८, ७९, ३(५) नुसार गुन्हा दाखल करून आरोपी दिलीप दशरथ पवार व नदीम अहमद अब्दुल रशीद (कलमठ, तालुका कणकवली) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. जामीन अर्जावर युक्तिवाद झाल्यानंतर संशयित आरोपीना प्रत्येकी ५० हजारांचा सशर्त जामिन मंजूर करताना सिंधुदुर्ग ओरोस येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी आरोपीनी फिर्यादी अथवा साक्षीदारावर दबाव आणू नये, त्याना धमकावू नये, सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ करू नये, रोज पोलिस स्टेशनला हजेरी लावावी, तपासकामात सहकार्य करावे आदी अटी घातल्या आहेत. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला.





