गुरुप्रसाद शिंदे यांचा खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात झंझावाती प्रचार

खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात महायुती मधील शिवसेना शिंदे गट पक्षाचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु असून घरोघरी जाऊन मतदार राजाच्या भेटी घेतं आहेत.संघात यंदा तिरंगी लढत होणार असून भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट पक्ष व आर पी आय आठवले पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद दीपक शिंदे यांनी आपल्या मतदार संघात प्रचारात आघाडी घेतली असून महायुतीचे सर्वच कार्यकर्ते उमेदवारसह डोर टू डोर प्रचार करत मतदाराच्या गाठी भेटी घेत आहेत.
खारेपाटण पंचायत समिती मतदार संघाचे महायुतीचे शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व माजी जि. प. बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, शिवसेना पक्षाचे कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण सरपंच तथा खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातून बिनविरोध निवडून आलेल्या भाजप पक्षाच्या उनवनिर्वाचित जि. प. सदस्य प्राची ईसवलकर, माजी सरपंच व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत, शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, भाऊ राणे, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, चिंचवली सरपंच अशोक पाटील, वायंगणी सरपंच अस्मि लाड, उपसरपंच प्रताप फाटक, सदस्य -शमिका सुतार,खारेपाटण सोसायटीचे संचालक इस्माईल मुकादम, मोहन पगारे, भाजप कार्यकर्ते रामा पांचाळ, शेखर कांबळी, महिला कार्यकर्त्या गौरी शिंदे, आरती गाठे, शीतीजा धुमाळे, शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते मंगेश ब्रम्हदंडे, सुहास राऊत, निशिकांत शिंदे, अस्ताली पवार आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.खारेपाटण सह चिंचवली, वायंगणी, नडगीवे, शेर्पे या गावात महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचाराला सुरवात झाली असून खारेपाटण पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या पाच ही गावांमधून खारेपाटण पं. स. उमेदवार गुरूप्रसाद शिंदे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.





