सखी महिला मंडळ खारेपाटण आयोजित सिंधुदुर्ग मॅरेथॉन -२०२४ ला स्पर्धेकांचा उदंड प्रतिसाद

विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीय सहभागी स्पर्धाकांना मेडल सन्मानपत्र प्रदान

सखी महिला मंडळ रामेश्वर नगर खारेपाटण यांच्या वतीने आज दि.3मार्च रोजी सकाळी 6 वाजता जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा अर्थात “वूमन रन फॉर हेल्थ” चे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवराच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिपेला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.या स्पर्धेचे मान्यवर सरपंच -प्राची इसवलकर, डॉ. प्रिया वडाम, दीपा रानडे, वननिरीक्षक -लोहार, पत्रकार -अस्मिता गिडाळे आदि उपस्थित होते.यामध्ये महिलांसह लहान मुले युवक – युवती ,जेष्ठ नागरिक अत्यंत उत्साहात सहभागी झाले होते.
खारेपाटण येथे आज रविवार दी.३ मार्च २०२४ रोजी सकाळी झालेल्या या सिंधुदुर्ग मॅरेथॉन स्पर्धेत किड्स रन – (मिनी मॅरेथॉन)अंतर – २.५ किमी., वुमेन्स रन – (हाफ मॅरेथॉन) – अंतर – ५.० किमी., ओपन रन -(फूल मेरेथॉन )अंतर -१०.० किमी. असे विविध टप्पे ठेवण्यात आले असून रन स्टार्ट पुढील प्रमाणे ठेवण्यात आले होते.१० किमी* – सकाळी ६.१५ वा.
५ किमी.- सकाळी ६.२५ वा. तर
२.५ किमी.- सकाळी ६.३५ वा. असा वेळ देण्यात आला होता.
ही मॅरेथॉन स्पर्धा ही मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग खारेपाटण पोलीस चेकपोस्ट समोरील ब्रीज ते खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन चींचवली कडे जानाऱ्या रस्त्यावर झाली असून या स्पर्धेकरिता कोणतेही प्रवेश शुल्क घेण्यात आले नाही. या स्पर्धेला 10किमी अंतर धावणे यासाठी 18 स्पर्धक, 5किमी अंतर धावणे यासाठी -49 स्पर्धक, 2.5 किमी अंतर धावणे यासाठी 63 स्पर्धाकांची नोंद झाली.प्रत्येक रन मधील पहिल्या अनुक्रमे तीन नंबरना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आले. यामध्ये 10किमी धावणे प्रथम -निलेश लक्ष्मण कांजीर, द्वितीय -प्रतीक संदीप भालेकर, तृतीय -सूरज संतोष रानम यांनी बहूमान पटकवला. तसेच 5किमी धावणे प्रथम – शोभा दशरथ पाटील, द्वितीय -प्राजक्ता दीपक पाटणकर, तृतीय -संजना सतीश सावंत अश्या स्पर्धेकांनी बहुमान पटकवला. व 2.5 किमी धावणे प्रथम -वेदिका अनिल पवार, द्वितीय – साहिल संग्राम अडुळकर, तृतीय -हर्षल लक्ष्मण अडुळकर,यांनी बहुमान पटकवला, या स्पर्धेत यशस्वी सर्व स्पर्धाकांना मान्यवराच्या हस्ते मेडल सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत जे स्पर्धक 10किमी,5किमी,2.5 किमी अंतर धावणे सहभागी होऊन स्पर्धा पूर्ण केली त्या सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देखील मंडळाच्या वतीने देण्यात आले.तसेच मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना पाणी व नाश्ता ची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम यांनी सुद्धा या मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान कोणाला वैद्यकीय गरज भासली तर त्यासाठी उपस्थित राहून बहुमोल असे सहकार्य केले. तसेच रामेश्वर – जिजामाता नगर मित्र मंडळ च्या सर्व कार्यकर्त्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले.तसेच डॉक्टर मालंडकर यांनी सुद्धा सखी महिला मंडळ आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेला विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले.स्पर्धेला उपस्थित असणारे सौ.सुजाता संजय देसाई यांनी सखी महिला मंडळ संघाला 5000 ची देगणी दिली.सदर आज झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला सर्वच स्पर्धक, खारेपाटण येथील नागरिक, तसेच सखी महीला मंडळ च्या अध्यक्षा -प्रणाली पंकज कुबल, उपाध्यक्षा -पूजा पाटील व इतर सर्व सखी महिला मंडळाच्या सदस्य या सर्वंनीच ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फार मोठे योगदान दिले.आज पर पडलेल्या या स्पर्धेचे व सखी महिला मंडळ चे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येतं आहे.या सर्व स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गुरव यांनी केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!