कणकवली शहरातील अवैध मटका, जुगार, गुटखा बंद करा!

भाजपा शहराध्यक्ष अण्णा यांच्यासह कार्यकर्त्यांचे पोलिसांना निवेदन
अन्यथा आंदोलन करणार
कणकवली शहरात अवैध्य रित्या चालू असलेल्या मटका, जुगार, ऑनलाईन कॅशिनो, गुटखा, गोवा दारू व गांज्या-चरस असे अनेक अवैध धंदे कणकवली शहरात राजरोसपणे चालू आहेत. याची वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे. तरीपण आपणाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आठ दिवसात या धंद्यांवर कारवाई न झाल्यास कणकवली पोलीस स्टेशन समोर आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाचे कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्यासहित औदुंबर राणे, निखिल आचरेकर, उदय यादव, कल्याण पारकर यांनी कणकवली पोलिसांना दिला आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, या अवैध धंद्यामुळे काही कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच यामुळे तरुण पिढी याच्या आहारी जाऊन ती सुद्धा बरबाद होत चालली आहे. तरी याची गंभीर दखल घेऊन हे धंदे ताबडतोब बंद करावेत अन्यथा हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद न झाल्यास कणकवली शहर भाजपच्या वतीने आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





