सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या कोर्ट यार्डचे भूमिपूजन

नवोदय विद्यालय नवी दिल्ली यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयसाठी कोर्ट यार्ड साठी 101 लाख 31 हजाराचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा विद्यालयाचे प्राचार्य ए.जी कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी डॉ संतोषकुमार यादव,हेमंतकुमार जोंधळे जगन्नाथ पाटील, सिताराम हिरेमठ अतिया खान, इंजिनिअर अमर पाटील दीपक कदम कार्यालयीन कर्मचारी सतीश धुरी अशोक नाईकवडी कपिलकुमार, अवधूत आमरे, संकेत सोजे, विद्यार्थी प्रतिनिधी सौख्या कांबळे, अभिनव तांबेकर, श्री केतकर, विद्यार्थी उपस्थित होते. येत्या दोन महिन्यात म्हणजे 20 मार्चपर्यंत कोर्ट यार्ड पूर्ण होईल असे प्राचार्य श्री कांबळे यांनी सांगितले





