शहर विकास आघाडीच्या सुशांत नाईक यांच्या विरोधात भाजपचे राकेश राणे यांचा अर्ज दाखल

कणकवली उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक रंगतदार होणार
सुशांत नाईक विरुद्ध राकेश राणे यांच्यातील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष
कणकवली नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदाकरिता आज निवडणूक प्रक्रिया होणार असून या निवडणुकीत कणकवली शहर विकास आघाडीकडून सुशांत नाईक यांचे नाव निश्चित झाल्यास झाल्यानंतर या निवडणुकीकरिता सर्वप्रथम भाजपाने प्रभाग क्रमांक 1 मधील विजयी उमेदवार नगरसेवक राकेश बळीराम राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. श्री राणे हे आपल्या भाजपाच्या नऊ नगरसेवकांसह कणकवली नगरपंचायत मध्ये दाखल झाले आहेत. भाजपाच्या सर्वच नगरसेवकांनी एकत्र येत हा उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे सादर केला आहे.या निवडणुकीकरिता पीठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष संदेश पारकर हे काम पाहणार आहेत. शहर विकास आघाडीकडून उपनगराध्यक्ष पदाकरिता सुशांत नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांच्यासोबत नगरसेवक जयेश धुमाळे, गटनेते रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, वैभव मालंडकर, मेघन मुरकर, सोहम वाळके, सुदीप कांबळे, बाळू पारकर, निकत् मुरकर आदी उपस्थित होते. यावेळी भाजपाचे नगरसेवक संजय कामतेकर, मेघा गांगण, गटनेत्या सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत, आर्या राणे, मेघा सावंत, स्वप्निल राणे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आदी उपस्थित होते. आता या निवडणुकीत सद्यस्थितीत शहर विकास आघाडीच्या बाजूने पारडे झुकलेले दिसत असले तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काय घडामोडी घडतात ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.





