शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 25मध्ये त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेचे घवघवीत यश

सप्टेंबर 25 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता. मालवण या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादित केले आहे. प्रशालेतून प्रविष्ट झालेले 13 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला आहे. एलिमेंटरी परीक्षेत एकूण सहा विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या मध्ये कु. तन्मय तुषार खवणेकर बी ग्रेड, आयुष उत्तम घाडीगांवकर सी ग्रेड, सारिका बाळकृष्ण वारंग सी ग्रेड, मयुरी गणेश घाडीगावकर सी ग्रेड, चेतन शंकर भावे सी ग्रेड, मानस संजय गावकर सी ग्रेड प्राप्त करून उत्तीर्ण झाले. तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत कुमारी श्रावणी प्रकाश कासले ए श्रेणीत, आर्या लक्ष्मण घाडीगावकर बी, वेदिका रविंद्र गावकर बी ग्रेड, नचिकेत लक्ष्मण घाडीगावकर बी ग्रेड, सोहम संजय घाडीगावकर सी ग्रेड, सावली गोविंद घाडीगांवकर सी ग्रेड, प्राजक्ता सुनील कदम सी ग्रेड प्राप्त करून उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. व्ही डी काणेकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक श्री. काणेकर सर यांचे सर्व संस्था पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, शालेय समिती अध्यक्ष व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!