खारेपाटण महाविद्यालयात राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण येथे स्वातंत्र्यसैनिक व शिक्षणतज्ज्ञ वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी भारतीय न्यायव्यवस्थेवी विश्वासार्हता..मिडियाः सत्याचा आवाज की सनसनाटीचा बाजार…???
विकास व पर्यावरण… आरे ते तपोवन. भारतीय लोकशाही… एकाधिकार शाहीच्या दिशेने…???
विसंगती भारतीय शिक्षणव्यवस्था आणि बेरोजगारी अशा समकालीन विषयांची निवड करण्यात आली आहे. राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून स्पर्धेत आकर्षक पारितोषिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याचा विकास होऊन त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे सर यांनी केले आहे.

error: Content is protected !!