चंद्रस्वा क्रिएशन संस्थेतर्फे ज्यूनिअर कॉलेज खारेपाटण येथे मुलींसाठी आरोग्य विषयक जनजागृती शिबिर संपन्न

शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटण येथे चंद्रस्वा क्रिएशन संस्थेतर्फे मुलींमध्ये आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमध्ये वाढणारे कॅन्सरचे प्रमाण याविषयी विद्यार्थिनींना या वयातच दक्षता घेणे गरजेचे आहे हे पटवून देणे ही काळजी गरज ओळखून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींना आपल्या आरोग्याविषयी जागृत राहण्याचे आवाहन संस्थेचे श्री. स्नेहल पेडणेकर व श्रीमती. रूपाली देसाई यांनी केले. विद्यार्थिनींना मासिक पाळी विषयी तसेच बांबू पासून बनविलेल्या बायो सॅनिटरी पॅड विषयी माहिती यावेळी देण्यात आली. मासिक पाळी मध्ये वापरण्यात येणारे प्लास्टिक पासून बनवलेले सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे त्याचे होणारे दुष्परिणाम व महिलांमध्ये वाढणारे कॅन्सरचे प्रमाण याविषयी विद्यार्थिनींना या वयातच दक्षता घेणे गरजेचे आहे असे मत स्नेहल पेडणेकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत, सर्व महिला शिक्षिका व श्रीमती आर्या कानडे उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन सौ. सारिका महिंद्रे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दर्शना पाताडे व आभार सौ. अमृते मॅडम यांनी मानले.

error: Content is protected !!