कुरंगवणे पश्चिम येथे नवीन स्मशानभूमी शेड चे भूमिपूजन संपन्न

कणकवली तालुक्यातील कुरंगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायत च्या वतीने नुकतेच कुरंगवणे पश्चिम येथील स्मशान भूमीत नवीन शेड चे भुमिपुजन गावातील जेष्ठ नागरिक श्री. शिवाजी उर्फ नाना गाडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.
यावेळी कुरंगवणे गावचे सरपंच श्री. संतोष उर्फ पप्पु ब्रम्हदंडे, भाजपचे तालुका कार्यकारिणी सदस्य रविंद्र लाड, माजी उपसरपंच प्रकाश जाधव, बुथ अध्यक्ष संजय लाड, मधुकर गाडे, सचिन कदम, श्री. शंकर गाडे, शंकर सादिकले, रविंद्र गोठणकर, संतोष पाष्टे, दिपक गोसावी, मोतिराम मांडवकर, दिगंबर गोसावी, उद्देश रामाणे, प्रभाकर गोठणकर, आत्माराम गोसावी, नितीन रामाने आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!