शालेय विभाग स्तरीय हाफकिडो बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल येथील विद्यार्थ्यांचे विभाग स्तरावर नेत्रदीपक यश – राज्यस्तरासाठी निवड

जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि शेठ. न. म. विद्यालय खारेपाटण सिंधुदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विभाग स्तरीय हाफकिडो बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाल्या. हापकिडो ही एक कोरियन मार्शल आर्ट असून ती लांब पल्ल्याच्या आणि जवळच्या लढाईच्या तंत्रांचा वापर या क्रीडा प्रकारात केला जातो.
जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे पार पडलेल्या शालेय विभागस्तरीय हापकिडो बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी विभाग स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरावर भरारी घेतली आहे. यावेळी हापकिडो बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य सचिव श्री. राज वागतकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती. माधुरी घराळ, राष्ट्रीय पंच श्रीमती. प्रिया डावरे, खारेपाटण कॉलेज चे प्राचार्य श्री. संजय सानप, आदी मान्यवर उपस्थित होते. विविध वजनी गटात व वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये खालील वयोगटातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
वजन गट 46 किलो मुले
१) कुमार अरुण गणेश जामसंडेकर प्रथम क्रमांक
वजन गट 49 किलो मुले
१) कुमार सम्मेद अजित उपाध्ये प्रथम क्रमांक
वजन गट 61 किलो मुले
१) कुमार सोहम राजेंद्र पवार प्रथम क्रमांक
वजन गट 67 किलो मुले
१) अहमद रजा फैयाज पावसकर प्रथम क्रमांक
वजन गट 64 किलो मुले
१) कुमार अजय आप्पा हिप्परकर द्वितीय क्रमांक
वजन गट 39 किलो मुली
१) कुमारी. त्रिवेणी विशाल परब प्रथम क्रमांक
वजन गट 42 किलो मुली
१) कुमारी. अनुष्का ज्ञानेश्वर गाडे प्रथम क्रमांक
वजन गट 45 किलो मुली
१) कुमारी अनुष्का संतोष धुवाळी प्रथम क्रमांक
वजन गट 48 किलो मुली
१) कुमारी रिया दीपक वाघरे प्रथम क्रमांक
वजन गट 51 किलो मुली
१) कुमारी तेजस्वी प्रवीण मिशाळ प्रथम क्रमांक
वजन गट 54 किलो मुली
१) कुमारी सानिका टोपाणा गावडे प्रथम क्रमांक
वजन गट 60 किलो मुली
१) कुमारी सानिका सतीश पवार प्रथम क्रमांक
वजन गट 63 किलो मुली
१) कुमारी श्रावणी शिवाजी कानडे प्रथम क्रमांक प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री. पाडवी सर आणि भिसे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती निलिमा अडसूळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
दक्षिण आशिया टेकयान महासंघाचे महासचिव एड. श्री. राज वागदकर आणि जिल्हा हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री. संजय सानप यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे सचिव श्री. महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त, प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, सर्व शिक्षक वृंद आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.





