शासकीय रेखा कला स्पर्धेमध्ये शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाद्वारे (MSB) आयोजित केल्या जाणाऱ्या रेखा कला स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या परीक्षेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर रेखाचित्रे, डिझाइन, भूमिती आणि स्मरणशक्तीवर आधारित चित्रे काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कलेमध्ये मजबूत पाया मिळतो आणि पुढील उच्च शिक्षणासाठी व व्यावसायिक संधींसाठी मदत होते. शेठ न. म. विद्यालय खारेपाटण मधील खालील विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवित उज्वल यश संपादित केले.
एलिमेंटरी परीक्षा 2025
1) कु. आर्या निलेश करांडे (ग्रेड A)
2) कु. अनुष्का विनोद सुतार (ग्रेड A)
3) कु. जय प्रशांत सुतार (ग्रेड B)
4) कु. रितेश गोरक्षनाथ गायकवाड (ग्रेड B)
5) कु. सांगवी संदीप जामसंडेकर (ग्रेड B)
6) कु. आराध्या प्रकाश निग्रे (ग्रेड C)
7) कु. अनुश्री हरिहर सरवणकर (ग्रेड C)
8) कु. चिन्मय मंगेश गुरव (ग्रेड C)
9) कु. निलेश संजय गारगुंडे (ग्रेड C) 10) कु. रेवण अनंत राऊळ (ग्रेड C)
11) कु. श्रावणी सत्यवान सुतार (ग्रेड C)
12) कु. सिद्धी सचिन राऊत (ग्रेड C)
13) कु. वेदिका अनिल पवार (ग्रेड C)
इंटरमेडिएट परीक्षा 2025
1) कु. तहसीन मु अहमद पटेल (ग्रेड A)
2) कु. ऋतुजा गो. गायकवाड (ग्रेड B)
3) कु. अनुराग सचिन महिंद्रे (ग्रेड C)
4) कु. प्रतिभा शिवाजी पतीयान (ग्रेड C)
5) कु. समर्थ बाळासाहेब जाधव (ग्रेड C)
6) कु. स्वरा रमेश जामसंडेकर (ग्रेड C)
7) कु. तनुश्री लवेश सौंदळकर (ग्रेड C)
8) कु. वैष्णवी रवींद्र पांचाळ (ग्रेड C)
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील चित्रकला शिक्षक श्री गिरी आर. आर. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. रघुनाथ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.





