अखेर कणकवलीच्या उपनगराध्यक्षपदी सुशांत नाईक विजयी

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निर्णायक मताने विजय झाला सोपा
कणकवली शहर विकास आघाडीच्या वतीने जोरदार जल्लोष
कणकवली नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेर कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार सुशांत श्रीधर नाईक हे 10 मते घेत विजयी ठरले आहेत. भाजपाचे 9 नगरसेवक यांनी उमेदवार राकेश राणे यांच्या बाजूने हात वर करून मतदान केले. शहर विकास आघाडीचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या बाजूने 8 नगरसेवक तर नगराध्यक्षांनी नगरसेवक म्हणून 1 मत दिल्यावर 9 मते झाली त्यानंतर समसमान मतदान झाल्यावर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपले नगराध्यक्ष म्हणून असलेले निर्णायक मत सुशांत नाईक यांच्या बाजूने दिले. त्यामुळे सुशांत नाईक यांना एकूण 10 मते तर राकेश राणे यांना 9 मते मिळाली. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी यांचे संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी सभागृहात नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, दीपिका जाधव, जुई मुरकर, सुमेधा अंधारी, लुकेश कांबळे, रुपेश नार्वेकर, उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार सुशांत नाईक, प्रतीक्षा सावंत, सुप्रिया नलावडे, आर्या राणे, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, मेघा गांगण, राकेश राणे, संजय कामतेकर, स्वप्निल राणे, स्वीकृत नगरसेवक बाळू पारकर, बंडू हर्णे आदि उपस्थित होते.





