रिल मेकींग स्पर्धेत सिद्धेश चव्हाण प्रथम

भालचंद्र महाराज जन्मोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन
प. पू. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 122 व्या जन्मोत्सव दिनानिमित्त नमो भालचंद्र ग्रुपच्या वतीने आयोजित रिल मेकींग स्पर्धेला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रिल मेकींग स्पर्धेत सिद्धेश चव्हाण (डार्क स्नॅप स्टुडिओ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.विजेत्या स्पर्धकांना मान्यवराचे हस्ते गौरविण्यात आले.
रिल मेकींग स्पर्धेत द्वितीय क्रमांक निखिल नाईक (कणकवलीचा निखिल), तृतीय क्रमांक विघ्नेश माणगावकर (एडीट हाऊस) यांनी मिळविला.
यावेळी उमेश वाळके, काशीविश्वेश्वर देवस्थानचे सभासद शशिकांत कसालकर, रमेश पारकर, गावडे बुवा, महेश अंधारी, प्रद्युम मुंज, चेतन अंधारी, संतोष पुजारे, नाना कोदे, सर्वेश शिरसाट, श्री. पारकर गुरुजी, पिंट्या महाडिक, नंदू वाळके, श्री. सामंत, श्री. माणगावकर, विशाल नेरकर, वृद्र सापळे, अमोल बोभाटे आदी मान्यवर, भक्तगण तसेच नमो भालचंद्र ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण रविकिरण शिरवलकर यांनी केले.
विशेष म्हणजे, दीपोत्सव घर सजावट व रील स्पर्धा सलग सातव्या वर्षी आयोजित करण्यात आली असून, सातत्याने राबवली जाणारी ही उपक्रमशील स्पर्धा शहरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या स्पर्धेमागील मुख्य उद्देश म्हणजे जन्मोत्सवाच्या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरणासहित स्वच्छता, समाज प्रबोधन तसेच येथील कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करणे आणि रील स्पर्धेतील व्हिडिओ मधून हा उत्सव देश भरात पसरावा देश विदेशातील भक्तांना चित्रीकरणाच्या माध्यमातून हे दृश्य पाहता यावे हे असल्याचे नमो भालचंद्र ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.





