किरण सामंत च असणार लोकसभेला महायुतीचे उमेदवार

शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्ते मंगेश गुरव यांचा विश्वास
रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी ही शिवसेनेची च आहे. महायुती मध्ये जरी आम्ही असलो तरी शिवसेनेच्या उमेदवारी च्या जागेवरील शिवसेनेचा हक्क आम्ही सोडला नाही. आमचे नेते पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे देतील तो उमेदवार आम्ही निश्चित पणे निवडून आणणार आहोत. या लोकसभेची उमेदवारी फक्त किरण भैया सामंत यांची असून संपूर्ण सिंधुदुर्ग -रत्नागिरी मधील तमाम शिवसैनिक किरण सामंत यांच्या पाठीशी ठाम उभा आहे, व आम्हाला ठाम विश्वास आहे की लवकर च लोकसभाच्या उमेदवारी साठी किरण सामंत यांचे नाव जाहीर होईल. व मित्रपक्ष भाजपा च्या सहकार्याने महायुती चे उमेदवार म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये रेकॉर्ड ब्रेक लीड ने ही जागा शिवसेना जिंकेल. मागील दोन टर्म उबाठा चे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले त्यांनी गेली दहा वर्षात कोकण विकासासाठी कोणते विकास प्रकल्प कोकणात आणले ते सांगावे असा सवाल मंगेश गुरव यांनी उपस्थित केला.उलट येणाऱ्या सर्व प्रकल्पना विरोध करून व जनतेमध्ये गैरसमज पसरवून सर्व सामान्य गोरगरीब जनतेचा रोजगार हिरावून घेण्याचं काम या उबाठा च्या खासदारांनी केलं आहे.अश्या या कार्यशून्य नेतृत्वाला लोक निवडणुकीच्या माध्यमातून चोख उत्तर देतील असा ही विश्वास मंगेश गुरव यांनी व्यक्त केला.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण