यंगस्टार मित्रमंडळाचे कार्य कौतुकास्पद- बाळा वळंजू

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सौजन्याने यंगस्टार मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सौजन्याने यंगस्टार मित्र मंडळ कणकवली यांच्यावतीने श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाळा वळंजू यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी भालचंद्र महाराज संस्थांनाचे व्यवस्थापक विजय केळुसकर, काशीविश्वेश्वर मंदिराचे अध्यक्ष प्रवीण पारकर, यंगस्टार मित्रमंडळाचे अध्यक्ष अण्णा कोदे, सल्लागार अनिल हळदिवे, रुपेश परब, उपाध्यक्ष भैय्या आळवे, सचिव नंदू वाळके, रवी सावंत, अमिता राणे, संतोष सुतार, मंदार कोदे, संदीप पेंडुरकर, मोहन तळगांवकर, संजय कात्रे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बाळा वळंजू म्हणाले, यंगस्टार मित्रमंडळाचे काम फारच कौतुकास्पद आहे. कबड्डी या खेळातून यंगस्टार मित्र मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने विविध सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात आपले नाव लौकिक केले आहे. त्याचबरोबर या मंडळाला कणकवलीकरांचीही उत्कृष्ट साथ लाभली. ही सौभाग्याची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर आदर्श संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भक्तीगीत, भावगीत संगीतमय कार्यक्रम सादर करत कणकवलीकरांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केले तर आभार अण्णा कोदे यांनी मानले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!