बाधकाम इमारत कामगारांच्या समस्या तात्काळ दुर कराव्या
गुरुनाथ गावकर यांची मंत्री दीपक केसरकर याच्याकडे मागणी
इमारत बांधकाम कामगार यांना जाचक अटीमुळे सरकारी सुविधा मिळणे झाले कठीण
योजना राहीली फक्त कागदोपत्री
रामचंद्र कुडाळकर । सावंतवाडी : बाधकामं इमारत कामगारांच्या समस्या तात्काळ दुर कराव्या अशी मागणी मळगावचे सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर यांची राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर याच्याकडे केली आहे. इमारत बांधकाम कामगार यांना जाचक अटीमुळे सरकारी सुविधा मिळणे झाले कठीण आणि योजना राहीली फक्त कागदोपत्री राहिली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
बाधकामं इमारत कामगारांची नोंदणी केल्यावर त्याना व त्यांच्या कुटूंबियांना विवीध लाभ मिळतात परंतू हि नोंदणी दर वर्षी नुतनीकरण करणे बंधनकारक असून सर्व बाबींची पूर्तता असताना ग्रामसेवक शिफारस पत्रावर सह्या करत नाहीत. त्यामूळे बर्याच कामगारांच्या नुतनीकरणाची तारीख संपली असून या कामगारांना लाभापासून वंचीत रहाव लागेल याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे .अशी तक्रार ईमारत कामगारांची असून ग्रामविकास अधिकारी यांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायत कार्यक्षेत्राबाहेर काम करणार्यांना आपण सह्या देउ शकत नाही.फक्त गावात काम करणार्यांनाच आपण सह्या देउ शकते.अशावेळी गावाबाहेर काम करणार्यांवर अंन्याय होत असल्याच कामगारांच म्हणण आहे.सरपंच मळगाव यांने गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आपण कामगार कंल्याण अधिकार्यांशी बोलून माहिती घेतो असे बी.डी.ओ. नाईक यांनी सांगीतले.
यावेळी यावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याशी संपर्क केला असता आपण ईमारत कामगारांवर अंन्याय होउ देणार नाही असे सातार्डेकर याना सांगीतले.
रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी.