रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सभा संपन्न

आचरा रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासदांनी जुन्याच कार्यकारी मंडळावर विश्वास दाखवल्याने कार्यकारी मंडळाची बिनविरोध निवड झाली.

रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या अध्यक्षतेखाली रामेश्वर भक्तनिवास येथे संपन्न झाली.यावेळी जेष्ठ नागरिक लक्ष्मण आचरेकर, साहित्यिक सुरेश ठाकूर,सुभाष सांबारी, वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी,चंद्रकांत घाडी,जयप्रकाश परुळेकर,सौ उज्वला सरजोशी,दौलत राणे,राजा जोशी,मंदार सरजोशी,पाडूरंग वायंगणकर मुकेश सावंत यासह ग्रंथपाल विनिता कांबळी सांस्कृतिक समिती सदस्य वर्षा सांबारी,श्रद्धा महाजनी, कामिनी ढेकणे,भावना मुणगेकर, रुपेश साटम,विलास आचरेकर, नरेंद्र कोदे यांसह इतर सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळीॲड सायली आचरेकर पुरस्कृत कै मारुती आचरेकर चोखंदळ वाचक पुरस्कार सौ उल्का घाडी यांना अध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते मृदूला आचरेकर, व अथर्व आचरेकर यांच्या उपस्थिती प्रदान करण्यात आला. यावेळी सन 2023-2028सालासाठीची नुतन कार्यकारिणी निवडीत जेष्ठ सदस्य लक्ष्मण आचरेकर यांनी जुन्याच कार्यकारी मंडळाचे काम चांगले असून तीच पुन्हा कार्यरत रहावी असे मत व्यक्त केले.त.याला उपस्थित सदस्यांनी अनुमोदन देत निवड बिनविरोध केली. यात बाबाजी भिसळे, अर्जुन बापर्डेकर, अशोक कांबळी, सौ उर्मिला सांबारी, सौ दिपाली कावले,भिकाजी कदम,विरेंद्र पुजारे यांची निवड झाली. तर दोन रिक्त पदांवर श्रीमती वैशाली सांबारी व जयप्रकाश परुळेकर यांची बिनविरोध निवड झाली.संस्थेतर्फे वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधुन दहावी, बरावी,स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव केला गेला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक ग्रंथपाल महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, स्वप्नील चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!