वटवृक्ष कोसळून नेरूर पोलिस पाटील यांचे नुकसान

मुसळधार पावसाचा तडाखा

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूरचे पोलिस पाटील गणपत मेस्त्री यांच्या घराजवळ असलेल्या वडाचे भले मोठे झाड कोसळून गणपत मेस्त्री यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये ८ नारळाची झाडे उध्वस्त झाली, सुपारीची १५ झाडे उध्वस्त झाली आणि बाजूला असलेल्या भात शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!