विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब करा – डॉ. एस.बी. सावंत

संत राऊळ महाराज महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 वर व्याख्यान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताहाचा शुभारंभ

प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सप्ताह साजरा केला जात आहे. 24 जुलै ते 29 जुलै या दरम्यान हा साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावरील व्याख्याने झाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. एस. बी. सावंत हे होते. पुढील वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण महाविद्यालयांमध्ये व शाळांमध्ये लागू होत असून येणाऱ्या काळामध्ये प्राध्यापकांनी बदलले पाहिजे. शिक्षक केंद्रित शिक्षण पद्धती ऐवजी शिक्षकांनी ‘विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा’ अवलंब केला पाहिजे. वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीचा वापर आपल्या वर्गामध्ये केला पाहिजे, त्याचबरोबर बदलत्या शैक्षणिक धोरणांमध्ये काय नवीन बदल होणार आहेत व त्याची तयारी शिक्षकांनी कशी केली पाहिजे याबद्दलचे सगळे विवेचन डॉ सावंत यांनी आपल्या मनोगतात केले.


या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही. बी. झोडगे हे लाभले होते. डॉ. झोडगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतांमध्ये मल्टिपल एन्ट्री आणि एक्झिट तसेच एका वर्षासाठी सर्टिफिकेट, दोन वर्षासाठी डिप्लोमा, तीन वर्षासाठी डिग्री आणि चार वर्षासाठी ऑनर्स व रिसर्च डिग्री अशा प्रकारचे नवीन शैक्षणिक धोरणाच्या तरतुदी आपल्या मनोगत मधून विशद केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ आर वाय ठाकूर यांनी केले. तर प्रास्ताविक आय. क्यू. ए. सी. कॉर्डिनेटर डॉ. ए. एन. लोखंडे यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होता.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!