नेरूर येथे दरड कोसळून वाहतूक ठप्प

घटनास्थळी भाजप नेते रणजीत देसाई यांची पाहणी

प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दरड कोसळून नुकसान होत आहे. अतिवृष्टीमुळे सोमवारी नेरूर- कांडरीवाडी येथील विठोबाची खांद या ठिकाणी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. आज भाजप नेते तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई आणि माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सोबत ग्रामपंचायत सदस्य पपू नारिंगेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!