बेवारस मृतदेहाबाबत ओळख पटविण्याचे आवाहन

ब्युरो न्यूज । मालवण : तालुक्यातील विरण पोईप पुलाखाली आढळलेला बेवारस मृतदेह ओळखीचा असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.
मालवण येथील विरण पोईंप पुलाच्या खाली पाण्यात बुडून एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह येथील पोलीस पाटील निनाद रमेश माळी यांना सापडलाअसल्याची माहिती मालवण पोलीस स्थानकात दिली आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या आधारकार्ड नुसार मिळालेली माहिती अशी आहे, नाव मनोज प्रल्हाद मोरे वय वर्ष ३६ रा. सबेस्टियन, जे. डि.सिल्वहा चाळ, संतोषी माता रोड ,धोबी घाट जवळ दहिसर पश्चिम मुंबई, हा मृतदेह पोलिसांना ता.८ ला सापडला आहे. आधार कार्ड वर असलेल्या पत्त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता येथेअशी कोणीही व्यक्ती रहात नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
या मयताचे कोणीही नातेवाईक, अगर मित्रपरिवार मिळून आल्यास अथवा आपल्या ठिकाणी कोणी मिसिंग असल्यास त्याचे नाव व नातेवाईक यांचे नाव संपर्क क्रमांक मालवण पोलीस मालवण पोलिसांना अधिक तपासणीसाठी करण्यासाठी देण्याचे सहकार्य करावे. तसेच फोटोतील मयत व्यक्ती कोणाच्या परिचयाची असेल तर त्वरित मालवण पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .संपर्कासाठी क्रमांक पोलीस निरीक्षक,अशोक कोल्हे मो९७६७७००५०१, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद नाईक,मो. ९४०४४४७३७५, पोलीस कॉन्स्टेबल विजय फरांदे मो.८२७५६९६०५६ या वर संपर्क करावा.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मालवण.

error: Content is protected !!