जुगाराच्या वादातुन कणकवलीतील जुगाऱ्याच गोव्यात डोकं फोडलं
मारहाण झालेल्या जुगाऱ्याचा फोटो “कोकण नाऊ” च्या हाती
डोक्याला गंभीर दुखापत, खुर्ची मारल्याची ही चर्चा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जुगारासाठी गोव्यामध्ये गेलेल्या एका प्रसिद्ध खेळीला गोव्यामध्ये बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. या मारहाणीत त्या जुगाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, डोक्यावर खुर्ची मारल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील अनेक जुगारी हे गोवा या ठिकाणी जुगारासाठी जात असतात. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील एका प्रसिद्ध जुगाऱ्या चा देखील समावेश आहे. कणकवलीतील जुगाऱ्याने गोवा येथे खेळायला गेल्यानंतर तेथे काही कारणातून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या पूर्वी कायम चर्चेत असलेल्या या जुगाऱ्यला बेदम मारहाण झाल्याचे समजते. दरम्यान या घटनेतील जखमी जुगाऱ्याचा फोटो कोकण नाऊ च्या हाती लागला असून या घटनेची चर्चा जोरात सुरू आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली