श्री देव कुणकेश्वर चरणी शिवपिंडीवर अभिषेक करत अतिरुद्र स्वाहाकारचे निमंत्रण

आशियेमठ येथील श्री दत्तक्षेत्र येथे 25 जानेवारीपासून अतिरुद्र स्वाहाकार कार्यक्रम
कणकवली आशिये पुरातन दत्त मंदिरामध्ये मंदिराचा वर्धापन दिन 2 फेब्रुवारी रोजी आहे. त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 25 जानेवारीपासून 9 दिवसांचा अतिरुद्र स्वाहाकार विधी त्या ठिकाणी करतोय. त्या कार्यक्रमाची पत्रिका ठेवण्यासाठी आम्ही कुणकेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत. ही अतिरुद्र स्वाहाकार ही शंकराची उपासना आहे, शंकराची सेवा आहे. आपल्या भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, जी महत्त्वाची मानली जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले कुणकेश्वराचे देवस्थान हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंग एवढेच मोठे आहे, अशी आमची धारणा आहे, त्यामुळे श्रीदेव कुणकेश्वर चरणी शिवपिंडीवर अभिषेक करत अतिरुद्र स्वाहाकारचे निमंत्रण दिल्याचे समितीचे अध्यक्ष विलास खानोलकर यांनी सांगितले.
श्री देव कुणकेश्वर चरणी शिवपिंडीवर अभिषेक करत अतिरुद्र स्वाहाकारचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने आशिये सरपंच महेश गुरव, दत्तक्षेत्र आशियेमठ समिती अध्यक्ष विलास खानोलकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचा संस्थेचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हाणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मिठबांव सरपंच भाई नरे, राजू करंबळेकर पांडूरंग बाणे, राजू म्हाडगूत, गुरुनाथ खानोलकर, पांडूरंग तुकाराम बाणे, सुनिल बाणे, मिलींद करंबळेकर, अभिषेक करंबळेकर आदींसह आशिये ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवपिंडींवर अभिषेक करत कार्यक्रमाचे निमंत्रण –
आमच्या आशियेमठ पुरातन दत्त मंदिर मध्ये होणारा अतिरुद्र स्वाहाकार आहे, ही रुद्र सेवा आहे. कुणकेश्वर हे शिवस्वरूप आहे, रुद्र स्वरूप आहे. आणि या कार्यक्रमाला त्यांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून आम्ही आशिये गावातील मंडळी, आशिये गावातील सरपंच महेश गुरव, आणि आमच्या मंदिरातील कमिटी आणि आम्ही सर्वजण याठिकाणी आलेलो आहोत. आम्ही कुणकेश्वर मंदिरामध्ये पत्रिका ठेवली व शिवपिंडीवर अभिषेक केला, या मंदिराचे आशीर्वाद घेतले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही अशा इतर ग्रामदेवतेची मंदिरे आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाणार आहोत , असे अध्यक्ष विलास खानोलकर यांनी सांगितले.
11 ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये देणार निमंत्रण –
आम्ही 11 ठिकाणी जाऊन आम्ही अशा प्रकारे पत्रिका ठेवून आशीर्वाद घेण्याचा आमचा मानस आहे. आम्ही त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 84 खेड्यांचा अधिकारी म्हणून ओळखला जाणारा साळशीचा संत श्री देव सिद्धेश्वर, पावणाई या ठिकाणी जाणार आहोत, त्यानंतर आचरा येथील रामेश्वर मंदिरात जाऊन आम्ही पत्रिका ठेवणार आहोत. तसेच हिंदळे येथे काळ भैरवाची देवता आहे, ज्या माणसांना शनीदेवतेबद्दल भीती वाटते, ती ग्रहाची गुरुदेवता आहे, तिथेही आम्ही पत्रिका ठेवणार आहोत. या कार्यक्रमासाठी आम्ही आशीर्वाद मागणार आहोत. त्यानंतर आमच्या आशिये गावाच्या चारही बाजूच्या सीमेला लागून जी गावे आहेत. त्यामध्ये वागदे, सातरल, कासरल, वरवडे, कलमठ, कणकवली या प्रत्येक ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन आमच्या कार्यक्रमाची पत्रिका ठेवणार आहोत आणि या सर्व देव देवतांचा आशीर्वाद घेणार आहोत, असे अध्यक्ष विलास खानोलकर यांनी सांगितले.





