अखेर ‘त्या “शाळेला शिक्षक मिळाला
प्रतिनिधी । कुडाळ : झाराप केंद्र शाळा नंबर१ मध्ये उपशिक्षक पदी सुधीर शिवाजी भांडारे यांना तात्पुरता अधिभार देण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळा सराफदार वाडी, पिंगुळी येथे ते कार्यरत आहेत. गटशिक्षणअधिकारी संदेश किंजवड़ेकर यांनी बुधवारी सायंकाळी तत्काळ आदेश दिल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान अखेर टाळले आहे. चिमुकल्यानच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा थांबल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.
झाराप केंद्र शाळा नंबर १मधे शाळेत शिकवण्यासाठी गुरुजी मिळत नसल्याने ग्रामस्थांवर “शाळा बंद” आंदोलन करण्याची नामुष्की ओढवली होती. झाराप येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील मुख्यध्यपीका अमिता सामंत यांची आंतर जिल्हा बदली वैभववाड़ी येथे झाली असल्याने मुख्याध्यापकाचे रिक्त पद तातडीने भरावे या मागणीसाठी गावकऱ्यांनी झाराप येथील भावई मंदिर येथे शाळा बंद आंदोलन केले होते.
झाराप केंद्र शाळा नंबर १ मधे ६४विद्यार्थी शिक्षण घेत आहे ४ शिक्षकांची पदे मंजूर असताना सध्या २ शिक्षक या शाळेत कार्यरत आहेत. नवीन पदवीधर शिक्षक शाळेला मिळवा यासाठीचे लेखी निवेदन ग्रामस्थानी दोन दिवसांपूर्वी शिक्षण विभागला दिले. मात्र येथील कार्यरत असणाऱ्या मुख्यध्यपाक सामंत यांना दूसरा शिक्षक प्राप्त झाल्याशिवाय कार्यमुक्त केल्याने. झाराप ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले होते. पदवीधर शिक्षक मिळेपर्यत, १ उपशिक्षक द्या मात्र तो गटसंसाधन केद्रातील किंवा सेवानिवृत्त शिक्षक नको अशी ग्रामस्थाची मागणी होती. मात्र ही मागणी सुद्धा उपशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकर मान्य करू शकले नसल्याने मुख्याध्यापकाचे एक पद रिक्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले होते. पदवीधर शिक्षक मिळेपर्यत “शाळा बंद ‘ ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थानी घेतला होता.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.