कुडाळ न्यायालय आणि विधी समितीच्या वतीने राष्ट्रीय युवादिन साजरा

व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजमध्ये आयोजन

कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विद्यमाने व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळ येथे आज राष्ट्रीय युवादिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कुडाळ दिवाणी न्यायालयचे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळचे अध्यक्ष जी ए कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी १२ जानेवारी रोजी साजरा केला जातो. जाे महान भारतीय संत योगी आणि समाजसुधारक स्वामी विवेकानंद यांचा वाढदिवस आहे. स्वामी विवेकानंदानी नेहमीच तरुणांना शक्ती स्वावलंबन समाजाप्रती जबाबदारीचा संदेश दिला. त्यांच्या जयंत्ती निमीत्य राष्ट्रीय युवादिन म्हणून साजरा करण्यात आला. व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळच्या प्राघ्यापीका श्रीमती वेदीका नाखरे यांचे अध्यक्षेतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. प्राध्यापक संग्राम गावडे व समृध्दी म्हाडगूत यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वकील अजिंक्य बिले यांनी बालकांचे लैगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम याविषयी कायदेविषक माहिती दिली. वकील श्रीमती उमा सावंत यांनी समाजात महिलांचे सुरक्षितता व गोपनियता या विषयी मार्गदर्शन केले. प्राघ्यापीका श्रीमती वेदीका नाखरे यांनी स्वामी विवेकानंदानी तरुणांना शक्ती, स्वावलंबन समाजाप्रती जबाबदारीचा दिलेल्या संदेशाची आठवण करुन दिली.
तसेच कुडाळ पोलीस स्टेशनचे वाहतुक नियंत्रक पोलीस हवालदार ए डी बंडगर यांनी रस्ता सुरक्षितता , वहातुक चिन्हे व वाहातुकीचे नियम याविषयी मार्गदर्शन केले. तसेच गाडी चालविताना वाहातुक नियमांचे काटेकोपणे पालन करणेचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे नियोजन विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कुडाळचे वरीष्ठ लिपीक आर. टी.आरेकर व चपराशी एम. एस. प्रभु यांनी केले. या कार्यक्रमात ५५ ते ६० विदयार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

error: Content is protected !!