सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा १६ ला स्नेहमेळावा

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी देखील उपस्थित राहणार

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक असोसिएशन कुडाळ तालुकांतर्गत सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचा स्नेहमेळावा शुक्रवार  १६ जानेवारी रोजी सकाळी ठिक १० ते २ या वेळेत मराठा समाज सभागृह कुडाळ, कुडाळ हायस्कुल नजीक येथे तालुकाध्यक्ष  श्री. घनःश्याम के. वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांच्या शुभहस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दळवी, ना. य. सावंत, किशोर नरसूले, औदुंबर मर्गज, जिल्हा सचिव सुंदर पारकर,
जिल्हा सदस्य मनोहर खामकर, जिल्हा सल्लागार सुधाकर खानविलकर, खजिनदार प्रताप बागवे, तालुका सल्लागार अरुण साळगावकर  यांची प्रमुख उपस्थिती आहे.
मेळाव्यात अहवाल वाचन, ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार, संघटनात्मक मार्गदर्शन, करण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमास सेवानिवृत्त प्राथ. शिक्षक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष घनःश्याम  वालावलकर, तालुका सचिव मनोहर  सरमळकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!