नवोदय विद्यालय सांगेलीचा सांस्कृतिक महोत्सव ठरला यादगार

महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानच्या संस्कृतीचे दर्शन

महाराष्ट्र राज्याच्या विविध लोककलासह गुजरात राजस्थान या संस्कृतीचे विविधांगी नृत्याविष्कारातून  पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय सांगेलीच्या मुलांनी दर्शन घडवित सांस्कृतिक महोत्सव यादगार ठरवला. मुलांनी सादर केलेल्या या विविध कलागुणांचे पालक शिक्षक यांनी भरभरून कौतुक केले.
   केंद्र सरकारच्या पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सांगेलीचा सांस्कृतिक महोत्सव  पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशालेच्या प्रांगणात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य अशोक कांबळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना प्राचार्य श्री. कांबळे म्हणाले, पीएम श्री नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी वर्ग हा शिक्षणाचे  धडे घेतानाच सांस्कृतिक क्षेत्रातही मागे नाही. त्यांच्या अभ्यासाबरोबरच त्यांना नृत्य, गायन, कला याचे ज्ञान होणे सुद्धा गरजेचे आहे. कला  सांस्कृतिक क्षेत्रात आमच्या प्रशालेने विविध पातळीवर नावलौकिक मिळवलेला आहे. क्रीडा क्षेत्रातही जवाहर नवोदय विद्यालयाने आपला ठसा उमटवलेला आहे. दरवर्षी मुलांना शिक्षणाबरोबर कला क्रीडा उपक्रमांतर्गत त्यांचे कलागुण कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे यावेत, या उद्देशाने दरवर्षी  सांस्कृतिक महोत्सव घेतला जातो असे सांगितले.
  सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनाने करण्यात आली. या महोत्सवात महाराष्ट्राची लोककला विविध कार्यक्रमातून नृत्य, गायन, वादन या विविध कार्यक्रमातून प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या लोककला बरोबरच गुजरात, राजस्थान, दक्षिण भारतीय रिमिक्स नृत्य, भरत नाट्यम आदी कलाविष्कार दाखवण्यात आले. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरही मुलांनी  कला सादर केली. गणेश वंदना, राजस्थानी लोकनृत्य, मराठी लोकनृत्य, राधानृत्य, समूहनृत्य, मुकनाट्य, लावणी आदी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.
या प्रशालेत कथक, योगा, एआय, संगीत आदी विविध प्रशिक्षण दिले जात असून या प्रशिक्षण अंतर्गतही या कार्यक्रमात मुलांनी योगा सादरीकरण केले. या महोत्सवात सहावी ते अकरावीची मुले सहभागी झाली होती. उत्तरोत्तर हा बहरत चालणारा कार्यक्रम मुलांच्या कलागुणांना तेवढाच दाद देणारा ठरला. शिक्षकांबरोबरच पालक वर्ग ही  मुलांच्या कलागुणांनी मंत्रमुग्ध झाला होता.
महोत्सव उद्घाटन प्रास्ताविक संतोषकुमार यादव यांनी केले. सूत्र संचलन  सौख्या, भूमि यांनी केले. आभार एम ओ डी श्रीमती प्राजक्ता यांनी मानले. सांस्कृतिक कार्यक्रम निवेदन सौख्या कांबळे, गायत्री पाटील, श्रेया वरदम, श्रेया गवस यांनी केले.

error: Content is protected !!