कणकवली महाविद्यालयात इतिहास कक्षाचे उद्घाटन
कणकवली/मयुर ठाकूर.
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात नुकतेच इतिहास कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
स्थानिक इतिहासाच्या शोध घेणे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे व विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव जागृती निर्माण करणे या उद्देशाने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी कणकवली कॉलेजचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथील इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक एस. एन. पाटील,स.ह.केळकर महाविद्यालय देवगड येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत शिरसाठे, कला व वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथील इतिहास विभाग प्रमुख डॉ. राज ताडेराव, कणकवली कॉलेज इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम तसेच प्रा डॉ. राजेंद्र मुंबरकर, डॉ.बी. एल. राठोड, प्रा. प्रियंका पाटील उपस्थित होते.
सुत्रसंचालन डॉ.मारोती चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन इतिहास कक्षाची अध्यक्षा कु. दिपाली पटकारे यांनी केले.