वेदांत गावकर याची ‘आयसर’ पुणे येथे निवड
कणकवली /मयुर ठाकूर
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील विज्ञान विभागाचा माजी विद्यार्थी वेदांत विजय गावकर यांची ‘आयसर’ पुणे येथे भौतिकशास्त्र या विषयातून इंटिग्रेटेड पीएच.डी. साठी निवड झाली आहे.
या साठी आवश्यक असलेली ‘जेस्ट’ ही परीक्षा सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र झाल्यानंतर वेदांत गावकर याची अंतिम निवड झाली.
ग्रामीण भागातून शिक्षण घेवून पीएच. डी. साठीनिवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते वेदांत गावकरचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विशेष मानद अधिकारी डॉ. संदीप साळुंखे, प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, डॉ. एस. टी. दिसले, डॉ.बी.जी.गावडे,प्रा.अरुण चव्हाण , प्रा.के.जी.जाधवर उपस्थित होते.
दरम्यान कणकवली महाविद्यालयातील माजी विद्यार्थी वेदांत गावकर यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, सचिव विजयकुमार वळंजू, सर्व संस्था पदाधिकारी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.