जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ प्रकरणी गोव्यातून एकास घेतले ताब्यात

एलसीबीची धडक कारवाई
दोडामार्ग पोलिसांच्या दिले ताब्यात
दोडामार्ग येथील रोहन सुभाष चव्हाण यांच्या अंगावर त्यांना मारण्याच्या हेतूने धावून जात त्यांना शिवीगाळ केली. तसेच मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गोव्यातील तरुणाला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला दोडामार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की, फिर्यादी हे घरी असताना फिर्यादी यांचे घराचे कंपाऊड मध्ये एक अनोळखी मुलगा दारु पित होता व त्याच्या सोबत असलेली त्याची मैत्रिण ही एका कोपऱ्यात लघुशंका करत असताना दिसली म्हणुन फिर्यादी यानी त्याना सदर ठिकाणी असे कोणतेही कृत्य करु नये म्हणुन सांगितले असता त्याला त्याचा राग येवुन त्याने फिर्यादी याचेशी वाद घालण्यास सुरुवात केली व आपले गाडीतील चाकु घेवुन फिर्यादी रोहन सुभाष चव्हाण याचेवर व त्याचे सोबत असलेले शुभम मुळगांवकर याचे पाठीमागे धावत आला व दोघांना शिवीगाळी करुन मारण्याची धमकी दिली देवुन आपल्या मैत्रिणीसह स्विफट गाडी नं GA07 E 6051 मधुन निघुन गेला म्हणुन गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचे समांतर तपासात तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीवरुन नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी चेतन दयानंद कोरगावकर, (वय 36 वर्षे,राह- सांताक्रूझ ओल्ड गोवा) यास मंगळवारी 14/07/2026 रोजी त्याच्या राहत्या परिसरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने आपण हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.
त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीकरिता दोडामार्ग पोलिस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
त्याच्यावर दोडामार्ग पोलिस ठाणे गुर.नं. 130/2026, भा.न्या.सं. कलम 131, 329(3), 351(3), 352 सह मपोका कलम 37(1)/135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड,
पोलिस हवालदार- जॅकसन घोन्सालविस, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, पोलिस अंमलदार- अमर कांडर, महिला पोलिस शिपाई धनश्री परब (सायबर) यांच्या पथकाने केलेली आहे.






