हरकुळ पोलीस पाटील संतोष तांबे यांचे श्रमदान!

जलसंधारणासाठी एकट्याने बांधला वनराई बंधारा.
कणकवली: मयूर ठाकूर जलसंधारणाचे महत्त्व ओळखून पावसाचे पाणी अडविण्यासाठी आणि त्याचा भविष्यात उपयोग व्हावा,या उद्देशाने हरकुळ येथील पोलीस पाटील संतोष तांबे यांनी स्वतः श्रमदान करत एकट्याने वनराई बंधारा बांधला.त्यांच्या या उपक्रमातून जलसंधारणाप्रती असलेली तळमळ आणि सामाजिक बांधिलकी दिसून येत आहे.सध्या विविध ठिकाणी जलसंधारणासाठी वनराई बंधारे बांधण्याचे उपक्रम राबविले जात आहेत.अशा परिस्थितीत केवळ इतरांवर अवलंबून न राहता स्वतः पुढाकार घेत संतोष तांबे यांनी केलेले श्रमदान प्रेरणादायी ठरत आहे.पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग होण्यासाठी वनराई बंधारे महत्त्वाची भूमिका बजावतात.भूजलपातळी वाढण्यास मदत होण्याबरोबरच परिसरातील जलसाठा टिकवून ठेवण्यासाठीही अशा उपक्रमांचा उपयोग होतो .‘पाणी अडवा,पाणी जिरवा’ हा संदेश कृतीतून देणाऱ्या पोलीस पाटील संतोष तांबे यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून,त्यांच्या श्रमदानातून इतरांनाही जलसंधारणासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळत आहे.लोकसहभाग,श्रमदान आणि जलसंधारणाची जाणीव यांची सांगड घालणारा हा उपक्रम गावाच्या पाणी संवर्धनासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.






