संजय घोडावत विद्यापीठाचा १६ ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ

९२९ विद्यार्थ्यांना पदवी-पदव्युत्तर पदव्या; १४ जणांना पीएच.डी.
संजय घोडावत विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM), नागपूरचे संचालक प्रा. डॉ. भीमराया मेत्री प्रमुख पाहुणे, तर गोवा सरकारच्या उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. गोपाळ मुगेराया सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.
या समारंभात इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाईन, मीडिया, फिजिकल अँड केमिकल सायन्सेस, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांतील एकूण ९२९ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदव्या, तर १४ जणांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी गौरविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. एस. एम. इंगळे यांनी दिली. विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले आणि कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.





