जिल्हास्तरीय स्क्वॅश स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजचे दैदिप्यमान यश

कणकवली/मयूर ठाकूर
शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत फातिमा शेख,प्राप्ती चव्हाण, तन्वी घाडीगावकर,यज्ञेश तेली, वैभव वरक, झेनुल शाह या विद्यार्थ्यानी विजय मिळवत विभाग स्तरावर झेप घेतली आहे या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री.वासुदेव दळवी सर, आणि क्रीडा शिक्षिका जिष्णा नायर मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
या यशाबद्दल यशस्वी विदयार्थी आणि प्रशिक्षकांचे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






