राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूलच्या आराध्य गोडवे ने कांस्यपदक मिळवत सिंधुदुर्ग च नाव राज्यात झळकवले.

कणकवली/मयूर ठाकूर

अकोला मूर्तिजापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेचा इयत्ता नववीचा विद्यार्थी आराध्य अवधूत गोडवे याने कांस्यपदक मिळवत आयडियलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विभाग स्तरावरून राज्यस्तरासाठी सिंधुदुर्गचा नेतृत्व करत असताना आराध्या ने हे अभूतपूर्व यश संपादन केले आहे नियमित सराव चिकाटी जिद्द या जोरावर आराध्यने हे यश खेचून आणले आहे.
या त्याच्या यशाबद्दल ज्ञानदा
संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!