त्या दोन होमगार्डचा ग्रामपंचायत आचरा तर्फे सन्मान

आचरा समुद्र किनारी मंगळवारी सकाळी समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या मुंबई भायखळा येथील मोहम्मद खान यांचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे होमगार्ड नितेश गुरव आणि अनिकेत परब यांचा आचरा ग्रामपंचायत तर्फे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले ग्रामपंचायत लिपिक नरेश परब, रुपेश परब,वराडकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!