आचरा मरीन होमगार्ड ची कौतुकास्पद कामगिरी

आचरा समुद्रात बुडणा-या पर्यटकाचा जीव वाचविला

आचरा समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या मुंबई भायखळा येथील पर्यटकाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे निदर्शनास आल्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन्ही होमगार्डनी तातडीने आपला जीव धोक्यात घालून पर्यटकांचा जीव वाचविण्यात यश मिळविले.त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत आचरा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
मंगळवारी सकाळी सध्या वास्तव्यास मुंबई भायखळा भेंडी बाजार,मुळ आचरा काझी वाडा येथील मोहम्मद खान वय २५हे समुद्रात स्नानाचा आनंद घेण्यासाठी उतरले असता भरतीमुळे पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात ओढले जाऊ लागले होते.याबाबत त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांनी ओरड मारण्यास सुरुवात केली होती.समुद्री सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले होमगार्ड नितेश गुरव आणि अनिकेत परब यांच्या हि बाब निदर्शनास येताच क्षणाचाही विलंब न लावता आपला जीव धोक्यात घालून सदर पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी समुद्रात झेपावत खान यांचा जीव वाचविला.याबाबतची खबर मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले, पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई, तुकाराम पडवळ, हेमंत पेडणेकर, पोलीस कर्मचारी मनोज पुजारे, विशाल वैजल, घाडीगांवकर यांसह पोलीस पाटील जगन्नाथ जोशी,ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब ग्रामस्थ अजय कोयंडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती.
होमगार्डच्या तत्परतेमुळे एका पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!