इंटरनॅशनल ओलंपियाड स्पर्धेत आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे चे नेत्र दीपक यश

कणकवली/प्रतिनिधी
इंडियन टॅलेंट ओलंपियाड यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल ओलिंपियाड या परीक्षेच्या सेकंड राउंड मध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. यामध्ये इंग्लिश ओलंपियाड या परीक्षेत इयत्ता सातवीतील तनिष्क निलेश ठाकूर हा राज्यात चौथा आला आहे. तर गंधार हेमंत पाटकर (इयत्ता दुसरी ) हा राज्यात बारावा आला आहे तर गणित ओलंपियाड मध्ये इयत्ता तिसरीतील कु.स्वर्ण रुपेश चव्हाण हा राज्यात 16 वा तसेच इयत्ता चौथी मधील कु. आध्या चौगुले ही राज्यात विसावी आली आहे. गणित ओलंपियाड मध्ये प्रशालेचा गौरेश श्रेयस तायशेटे याने इंटरनॅशनल लेवल मध्ये 1270 रँक मिळवली आहे त्याचप्रमाणे रिद्धी श्रेयस तायशेटे हिने इंग्लिश ओलंपियाड मध्ये इंटरनॅशनल लेव्हलमध्ये 319 झोनल रँक मिळवले आहे,त्याचप्रमाणे इंग्लिश गणित आणि ड्रॉइंग ओलंपियाड मध्ये दहा विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवली आहेत.
सर्व विद्यार्थ्यांचे ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल सर सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर,खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम सल्लागार श्री. डी. पी तानावडे सर मुख्याध्यापक सौ. अर्चना देसाई मॅडम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन केले आहे.






