कणकवली जुने भाजी मार्केट ठिकाणच्या शौचालयात ठेकेदाराकडून आकारले जातेय शुल्क

भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळाची नगरपंचायत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे शुल्क माफीची मागणी
नगरपंचायतच्या भूमिकेकडे लक्ष
कणकवली शहरात जुन्या भाजी मार्केटच्या ठिकाणी असलेले स्वच्छतागृह हे नूतनीकरण केल्यानंतर आता ते चालविण्यासाठी ठेकेदाराला दिले गेले आहे. मात्र ठेकेदाराकडून या स्वच्छतागृह मध्ये मुतारीकरिता वेगळे शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतागृहामध्ये यापूर्वी शौचालय या भागासाठी शुल्क घेतले जात होते. व ते योग्य देखील होते. परंतु आता ठेकेदाराकडून वेगवेगळे शुल्क आकारून मुतारी करता देखील पैसे आकारणी केली जात असल्याने हे शुल्क माफ करण्यात यावे. जेणेकरून जेष्ठ नागरिक महिला, शाळकरी विद्यार्थी, सर्वसामान्य जनता यांना नगरपंचायत मार्फत पूर्वीप्रमाणे मोफत सुविधा उपलब्ध होईल. अशी मागणी कणकवली जुने भाजी मार्केट या ठिकाणचे व्यापारी मित्रमंडळी यांच्या वतीने कणकवली नगरपंचायत कडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता नगरपंचायत मार्फत पूर्वीप्रमाणे सर्वसामान्य जनतेला येथे मोफत सेवा देण्याबाबत काय भूमिका घेतली जाते ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.






