आडवली येथील पटेल साॅ मिलला आग लागून लाखोंच नुकसान

सोमवारी पहाटे आडवली येथील पटेल साॅ मिलला आकस्मिक लागलेल्या आगीत मशनरी ,छप्पर, आणि लाकूड सामान जळून पटेल यांचे लाखोंचे नुकसान झाले.याबाबत माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले पण आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग विझविण्यात अडथळा येत होता. कुडाळ, मालवण,कणकवली नगरपंचायतीचे अग्निशामक बंब उपलब्ध न झाल्याने शेवटी कुडाळ एमआयडिशी चा बंब आणून आगीवर नियंत्रण आणण्यात आले.सदर आग
शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगितले जात आहे.

आचरा कणकवली रस्त्यालगत असलेल्या पटेल साॅ मिलला सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास आकस्मिक आग लागली. हि बाब येथे राहणारया कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी गिरणीचे मालक संजय पटेल यांना फोनवरुन संपर्क साधत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पटेल यांनी आडवली माजी उपसरपंच विनोद साटम यांना फोनवरून संपर्क साधात याची माहिती दिली त्यांनी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विनोद साटम यांच्या सोबत गिरणीचे कामगार तसेच सचिन घाडी , रवींद्र तावडे अनिल घाडीगावकर, कृष्णा हर्णे भरत हर्णे ,सचिन पुजारे, दीपक जाधव मुकेश हर्णे, जंगले ,नार्वेकर आदी च्या सोबतीने आग विझविण्यासाठी
प्रयत्न सुरू केले होते मात्र लाकूड सामान तसेच लाकडी भुशाने पेट घेतल्याने आग विझविण्यात अडथळे निर्माण होत होते .आगीची तीव्रता एवढी होती की छप्पराचे लोखंडी पाईपही वाकून गेले होते.. या बाबत पटेल यांनी अग्निशमक बंबा साठी कणकवली मालवण कुडाळ नगरपंचायतींना संपर्क साधत बंब उपलब्धतेसाठी प्रयत्न केले मात्र बंब उपलब्ध न झाल्याने शेवटी पटेल यांनी कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशामक बंब मागवित सकाळी साडेनऊच्या सुमारास बंब आल्यावर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले . दुपारी उशिरापर्यंत अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते आडवली सरपंच संदीप आडवलकर तलाठी एल एन देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.यात मिशनरी चे दहा लाखांचे नुकसान, छप्पर जळून आठ लाखांचे तर बारा लाखांचे लाकूड सामान जळून अंदाजित तीस लाखांचे नुकसानीचा पंचनामा केला आहे.

आचरा / अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!