संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
प्रतिनिधी । कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अलीकडेच उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी क.म.शि.प्र.मंडळाचे ,खजिनदार प्रदीप आंगचेकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.झोडगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी क्रीडा विभागप्रमुख डॉ.एन.पी.कांबळे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.व्ही.जी.भास्कर अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.ए.एन. लोखंडे प्रा.डॉ. एस.टी.आवटे आदी या प्रसंगी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह, पदक,प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रमुख अतिथी प्रदीप आंगचेकर यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व महाविद्यालच्या कार्यप्रणालीची प्रशंसा केली.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुशिक्षित व सुसंस्कृत मनुष्याला आवश्यक असणाऱ्या पंचसूत्रीचे महत्व सांगितले. प्राचार्य डॉ.व्ही.बी.झोडगे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख अतिथी प्रदीप आंगचेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.अनंत लोखंडे यांना शिक्षक भारतीचा प्रा.मधू दंडवते पुरस्कार मिळाल्याबद्दल तर प्रा.एन.पी.कांबळे यांचे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल त्यांचा प्रमुख अतिथी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. प्रा.सबा शहा यांनाही युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठात परीक्षक म्हणून काम केल्याबद्दल गौरविण्यात आले. वर्षभरातील विविध विभागांनी केलेल्या कामाचा आढावा घेत समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.बी.झोडगे यांनी सर्वांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक , क्रीडा, एन. एस. एस. व एन. सी. सी. तसेच डी.एल.एल.ई.आदी विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ भास्कर यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष वालावलकर यांनी केले.व आभार प्रा. कॅप्टन डॉ.एस.टी.आवटे यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.