रक्त दरवाढी विरोधात महाराष्ट्रातील पहिला मोर्चा कणकवली विधानसभेतून

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून जिल्हा रुग्णालयावर धडकला मोर्चा

सावरकर गौरव यात्रेवरून आमदार नितेश राणेंवर टीका

राज्य शासनाने रक्तपिशव्यांच्या दरात केलेल्या वाढीच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्वात पहिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज युवा सेनेच्या वतीने काढण्यात आला. हा मोर्चा भगव्यामय वातावरणात सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयावर धडकला. युवा सेनेच्या शिष्टमंडळाने याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच रक्तदात्यांनी रक्तदान देखील केले व शासनाच्या या दरवाढीचा निषेध केला. युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून झालेला हा मोर्चा हा राज्यात लक्षवेधी ठरला असून सर्वसामान्यांचा आवाज या मोर्चाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला असे त्यांनी सांगितले. या मोर्चा प्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या मोर्चानंतर जर राज्य शासनाने रक्त पिशव्यांच्या दरातील वाढ कमी केली नाही तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आंदोलनाचा वनवा पेटेल असा इशारा दिला. तसेच यावेळी मोर्चेकऱ्यानी सिडको कार्यालय ते जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत हात गाडीवर बेड तयार करत त्यावर एका व्यक्तीला झोपवून रक्तदानाचे प्रतिकात्मक आंदोलन केले. तर आमदार नितेश राणे यांच्यावर देखील सतीश सावंत, सदेश पारकर यांच्यासह मोर्चेकर्‍यांनी सावरकर गौरव यात्रेच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. युवा सेनेच्या वतीने काढलेल्या या मोर्चामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. मात्र सरकारने न्याय दिला नसला व हे सरकार 50 खोके एकदम ओके एवढ्या पुरते मर्यादित राहत असले तर युवासेना रस्त्यावर सातत्याने उतरेल असा इशारा देखील सुशांत नाईक यांनी दिला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, जान्हवी सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट, प्रमोद मसुरकर, शैलेश भोगले, राजू राठोड, उत्तम लोके, सचिन आचरेकर, राजू शेट्ये, सोहम वाळके, बाळू मेस्त्री, वैदेही गुडेकर, स्वरूपा विखाळे, सिद्धेश राणे, बंडू ठाकूर, कन्हया पारकर, सुदाम तेली, हर्षद गावडे, धीरज मेस्त्री, रोहित राणे, धनश्री मेस्त्री, दिव्या साळगावकर, युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे, सुहास ठुकरुल, निलेश राणे, सचिन सुतार, वैभव मराठे, रविंद्र रावराणे, गुरुनाथ पेडणेकर, अनुप वारंग, तेजस राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व कणकवली विधानसभेतील युवा सैनिक उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग

error: Content is protected !!