मराठा समाजाचे युवा नेते प्रताप भोसलेंच्या वाढदिनी सामाजिक उपक्रम

मंगळवार 22 जुलै रोजी साजरा होणार वाढदिवस

मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव, शिवजयंती उत्सव समिती कणकवलीचे अध्यक्ष, मराठा समाजाचे युवा नेते प्रताप भोसले यांचा वाढदिवस मंगळवार २२ जूलैला साजरा होत आहे. यानिमित्त प्रताप भोसले मित्रमंडळ व शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसानिमित्त कणकवली तालुक्यातील विविध अंगणवाड्यांमध्ये मुलांची बौद्धिक क्षमता वाढवणाऱ्या खेळण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ प्रताप भोसले यांच्या वाढदिनी, मंगळवार २२ जूलैला होणार आहे. या दिवशी कलमठ गावातील कुंभारवाडी, बाजारपेठ, बिडयेवाडी, गावडेवाडी येथील अंगणवाड्यांमध्ये, हरकुळ बुद्रुक येथील कोटेश्वर प्राथमिक शाळा अंगणवाडीत, कणकवली शहरातील शाळा नं ३ येथील अंगणवाडीत खेळणीवाटप करण्यात येणार आहे. यावेळी अजिंक्य लाड, कान्हा मालंडकर, संतोष उर्फ पप्पू पुजारे, संजय साळसकर, दिनेश सावंत, प्रविण उर्फ बाळा सावंत, रुपेश नाडकर्णी यांच्यासह त्या – त्या गावातील शिवजयंती उत्सव समिती कणकवली व प्रताप भोसले मित्रमंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत. तर त्यानंतर पुढील काही दिवस तालुक्यातील अन्य आंगणवाड्यांमध्येही खेळणीवाटप होणार आहे. शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती कणकवली व प्रताप भोसले मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!