प्रणाली मानेसह पती व मुलाला अटकपूर्व जामीन मंजूर

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद

राजकीय आरोपांमुळे या जामीन अर्जावर होते जिल्ह्याचे लक्ष

संशयीतांच्या अटकेसाठी झाली होती मोर्चा व आंदोलने

सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, पती मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य माने या तिघांच्याही अटकपूर्व जामीन अर्जावर आज सोमवारी निर्णय देत संशयीचांचा अटकपूर्व जामीन अर्ज अंतिमरीत्या मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्याने पोलीस यंत्रणेवरही दबाव होता. त्यामुळे या जामीनाबाबत काय निर्णय होतो त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. संशयित आरोपींच्या वतीने ॲड. उमेश सावंत, ॲड. संग्राम देसाई यांनी काम पाहिले. यापूर्वी प्रणाली माने व त्यांचा मुलगा आर्य माने यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर प्रणाली माने यांचे पती मिलिंद माने यांना देखील अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर फिर्यादी पक्षाची बाजू सरकार पक्षाकडून ऐकून घेण्यात आली. ४ जुलै २०२५ रोजी सौ. प्रिया हीने राहत्या घराच्या बेडरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. याबाबत ६ जुलै रोजी तीचे वडिल विलास तावडे रा. कलंबिस्त यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतिय न्याय संहिता कलम १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत दोन्ही संशयितांच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होत जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 2 व्ही. एस. देशमुख यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. 3 जुलै रात्री प्रणाली माने यांच्या आईच्या घरी रात्री 10.30 ते 11.39 या काळात एक बैठक झाली. यामध्ये प्रिया चव्हाण यांच्या चारित्र्यावर आरोप करण्यात आले. तसेच यावेळी अनैतिक संबंधाबाबत विचारणा देखील करण्यात आली. त्यावेळी 13 जन उपस्थित होते. त्या बैठकीनंतर प्रिया चव्हाण हिने खोलीत कडी लावून घेतली. व ती मिलिंद माने याच्याशी 18 मिनिटे बोलली. त्यानंतर सकाळी तिचा मृतदेह आढळला. याबाबत 6 जुलै रोजी प्रिया चव्हाण हिचे वडील यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये प्रिया चव्हाण हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रणाली व आर्य माने यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली., 14 जुलै रोजी संशयीतांची चौकशी करण्यात आली. यामध्ये मिलिंद माने यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जामीन अर्जाबाबत सरकारी पक्षाकडून म्हणणेही सादर करण्यात आले होते. या अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय होईपर्यंत तिघांनाही न्यायालयाने सशर्थ अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्या जामीन अर्जावर आज सोमवारी निर्णय देण्यात आला. यामध्ये संशयितानी साक्षीदारांवर दबाव न आणणे, तपासात ढवळाढवळ न करणे यासह अन्य अटी घालण्यात आल्या आहेत.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!