सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षा आणि बुद्धिबळ स्पर्धेत रिद्धी तायशेटे,श्रेयश तायशेटे आणि यश पवार चमकले.

कणकवली/मयूर ठाकूर

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षा स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या कु.रिद्धी श्रेयश तायशेटे, इयत्ता 4 थी हिने 138 गुण मिळवत रौप्य पदक मिळवले तर कु.गौरेश श्रेयस तायशेटे याने 168 गुण मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले.
त्याचप्रमाणे सन्माननीय खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने घेण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रशालेच्या यश देउ पवार (8 वी) याने 38 वा क्रमांक प्राप्त केला आहे त्याला रोख रक्कम,पदक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा. हरिभाऊ भिसे सर, सहसचिव प्रा. निलेश महिंद्रकर, खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम, सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई मॅडम, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!